स्वराज्य डिजिटल मॅगझीन


सतत लॅपटॉप, स्मार्टफोन पाहत असल्यास डोळयांवर तणाव येऊन डोळे आणि डोके दुखू लागते. डोळे दुखणे हा त्रास आता कॉमन झाला आहे.

आपल्याला काम तर टाळता येणार नाही पण आपण काही घरगुती सोप्या उपायांनी डोळ्यांना होणारा त्रास नक्कीच कमी करू शकतो.

अशी घ्यावी डोळ्यांची काळजी..

1) जर तुम्ही सतत लॅपटॉपवर काम करत असाल तर डोळ्यांची सतत उघडझाप करत राहा. यामुळे डोळ्यांमध्ये कोरडेपणा तसेच जळजळ होत असल्यास आराम मिळेल.

2) 4 ते 5 वेळा डोळे थंड पाण्याने धुवा.

3) कमी उजेडात काम करू नका, असे केल्यास लॅपटॉपच्या स्क्रीनचा उजेड थेट डोळ्यांत पडतो आणि त्रास वाढतो, त्याऐवजी रूममधील लाईट्स सुरु ठेवून काम करा किंवा सूर्यप्रकाश पडेल अशा ठिकाणी काम करा.

4) कोरफडीच्या जेलने डोळ्याला मसाज करा.

5) चष्मा असल्यास तो वापरण्यात अजिबात हलगर्जी करू नका.

6) किमान 1 तासाने 20 मिनिटांंचा ब्रेक घ्या.

7) डोळे बंद करून शांत बसा व दिर्घ श्वास घ्या, दोन्ही तळहात एकमेकांवर गरम होईपर्यंत घासा. मग गरम तळहात डोळ्यांवर ठेवा.

8) डोळे गोल फिरवणे, आजुबाजुला फिरवणे, खाली वर पाहणे, नाकाच्या टोकाकडे पाहणे असे मोजके व्यायाम करा.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने