स्वराज्य डिजिटल मॅगझीन

साबण तर आपण रोज वापरतोच पण आज कोरोनाच्या संकटात साबणाला अत्युच्च महत्व आले आहे. हात वारंवार साबणाने धुवा असा प्रचार सगळीकडे होत आहे.  पण तुम्हाला माहीत आहे का साबणाचा इतिहास काय आहे? जगात कधी तयार झाला पहिला साबण?

चला तर मग जाणून घ्या साबणाचा इतिहास..!


मित्रांनो साबण जवळपास २५०० वर्षांपूर्वीपासून मानवाला माहीत असल्याचे समजते. पण तो प्रथम केव्हा आणि कुठे तयार करण्यात आला, याची निश्चित माहिती नाही. 

(हेही वाचा: जाणून घ्या स्मार्टफोन मध्ये लपलेले फिचर्स)

बॅबिलोनियन संस्कृतीच्या लोकांनी इ.स पूर्व २८०० च्या दरम्यान साबण वापरला होता असे म्हटले जाते. इ.स ६०० मध्ये फिनिशियन लोकांनी साबण तयार केल्याची नोंद इतिहासात आढळते. 


स्वराज्य डिजिटल मॅगझीन

जनावरांची चरबी आणि लाकडाची राख वापरून साबण बनवला जात असत, असा उल्लेख इ.स ७७ मध्ये प्लीनी लोकांनी त्यांच्या 'हिस्टोरीया नॅचऱ्यालिस' या ग्रंथामध्ये केल्याचे आढळते. 

बाराव्या शतकात इंग्लंडमध्ये, तर तेराव्या आणि चौदाव्या शतकात लंडनमध्ये साबण बनवला जाऊ लागला. त्यानंतर सतराव्या शतकात अमेरिकेत साबण बनवला जाऊ लागला. ही साबण बनवण्याची कला घरगुतीच होती.  त्यामध्ये योग्य प्रमाण घटकांची कमतरता असल्याचे लक्षात आल्यानंतर डॉ. निकोलस लॅब्लांक यांनी १७८९ साली साबण निर्मितीसाठी उपयुक्त एका रासायनिक प्रक्रियेचा शोध लावला. 


स्वराज्य डिजिटल मॅगझीन

(हेही वाचा: लॅपटॉप, मोबाईल वर सतत काम करून डोळे दुखतात? तर करा 'हे' उपाय)

अठराव्या शतकानंतर साबण जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचला. आज लोकांनी साबणाचे बरेच लघु-उद्योग सुरू केले आहेत. विविध आकाराचे, वासाचे असे साबण आज आपल्याला बाजारात पाहायला मिळतात. तर मित्रांनो हा आहे साबणाच्या उत्क्रांतीचा इतिहास.

स्वराज्य मॅगझीन मधील ही माहिती अपल्याला कशी वाटली नक्की कॉमेंट करून सांगा..धन्यवाद

1 टिप्पण्या

  1. मराठी वाचकांना आवड निर्माण करण्यासाठी एखादे डिजिटल मॅक्झिन पाहिजे होते,आपण हेच विचारात घेऊन हे पर्व सुरू केले त्या बद्दल मी निलेश देशमुख तुम्हा ज्ञात-अज्ञात स्वराज्य डिजीटल मॅक्झिनच्या सर्व कर्मचारी बंधुंचे शतशः आभार

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने