आधुनिक क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळाडू सचिन तेंडुलकरचा आज जन्मदिवस! सचिन तेंडुलकर हे फक्त एक नाव नाही तर एक भावना आहे जी संपूर्ण देशाने अनुभवली आहे. दिग्गज क्रिकेटरने यापूर्वी कधीही देशासाठी कोणीही न मिळवलेले गौरव आणि वैभव जिंकले आहेत.
सचिन रमेश तेंडूलकरचा जन्म हा २४ एप्रिल १९७३ चा!
या अवलिया बद्दल तुम्हाला माहीत नसलेल्या अफलातून गोष्टी आणि 10 दमदार विक्रम जाणून घ्या
१) सचिनच्या वडिलांनी प्रसिद्ध संगीतकार एस.डी. बर्मन यांच्या नावावरून आपल्या लाडक्या मुलाचं ‘सचिन’ हे नामकरण केलं होतं. त्याचे वडिल सचिन देव बर्मन (एस.डी बर्मन) यांचे चाहते होते.
२) वयाच्या १४ व्या वर्षी सचिनने रणजी सामान्यांमध्ये खेळायला सुरुवात केली आणि रणजी सामन्यामध्ये खेळणारा तो आजवरचा सर्वात तरुण खेळाडू ठरला.
३) तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण सचिनला फास्ट बॉलर म्हणून नावलौकिक मिळवायचा होता, पण त्याचे हे स्वप्न भंगले. १९८७ साली चेन्नईच्या MRF Pace Academy प्रसिद्ध ओस्ट्रेलियन बॉलर डेनिस लिली याने सचिनला वेगवान गोलंदाज म्हणून रिजेक्ट केले होते.
४) सचिन हा उजव्या हाताने बॅटिंग आणि बॉलिंग करत असला तरी तो लिखाण मात्र डाव्या हाताने करतो.
५) सचिनच्या नावावर एक आगळावेगळा विक्रम आहे तो म्हणजे – तो असा एकमेव खेळाडू आहे ज्याला टीम हरलेली असताना देखील सहा वेळा Man-of-the-Match पुरस्कार मिळालेला आहे.
६) वयाची २० वर्षे पूर्ण होईपर्यंत सचिनने कसोटी कारकिर्दीमध्ये ५ शतके ठोकली होती, हा देखील क्रिकेट विश्वातील जागतिक विक्रम आहे.
७) सचिन तेंडूलकर हा एकमेव फलंदाज आहे ज्याने वर्ल्ड कप क्रिकेटमध्ये २००० रन्सचा टप्पा पार केला आहे.
हेही वाचा: जाणून घ्या स्मार्टफोन मध्ये लपलेले तुम्हाला माहीत नसलेले फिचर्स
८) सचिनची पहिली शॅम्पेन
जेव्हा १९९० साली सचिनला त्याच्या कसोटी कारकिर्दीतील पहिल्या सेंच्युरीसाठी Man-of-the-Match पुरस्कार मिळाला, तेव्हा त्याला सेलिब्रेशनसाठी शॅम्पेनची बॉटल देण्यात आली होती, परंतु तेव्हा त्याचे वय १८ पेक्षा कमी असल्याने कायद्याप्रमाणे तो मद्याचा वापर करू शकत नव्हता.
नंतर मात्र १९९८ साली आपल्या मुलीच्या पहिल्या बर्थडे वेळी त्याने शॅम्पेनची बॉटल उघडून पहिल्यांदा सेलिब्रेशन केले.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे १० दमदार विक्रम:
१) विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक वेळा सामनावीराचा किताब - ९
२) सर्वाधिक आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट सामने - ४६३
३) एका वर्षात सर्वाधिक धावा - १८९४
४) २०० कसोटी सामने खेळणारा जगातील एकमेव क्रिकेटपटू
५) ७० हून अधिक आंतरराष्ट्रीय शतके ठोकणारा खेळाडू
६) क्रिकेट कारकिर्दीत सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा - ३४, ३५७
७) वयाच्या २० व्या वर्षाआधी ५ कसोटी शतके करणारा एकमेव खेळाडू
८) जगातील तब्बल ९० वेगवेगळ्या मैदानांवर क्रिकेट खेळणारा खेळाडू; असा विक्रम आजपर्यंत कोणालाही जमला नाही
९) एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात द्विशतक करणारा पहिला खेळाडू
१०) विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू - २,२७८
हेही वाचा: जाणून घ्या जागतिक पुस्तक दिन का साजरा केला जातो?
good inform..
उत्तर द्याहटवाटिप्पणी पोस्ट करा