२३ एप्रिल हा जगप्रसिध्द महान साहित्यिक शेक्सपिअरचा जन्मदिन आणि मृत्यूदिनही! त्यांना आदरांजली म्हणून 23 एप्रिल हा जागतिक पुस्तक दिन साजरा केला जातो. पहिला जागतिक पुस्तक दिन 1995 ला साजरा केला गेला.
मित्रहो वाचाल तर वाचाल..! हे वाक्य प्रसिद्ध तर आहेच शिवाय अर्थपूर्ण आहे. आज पुस्तक दिनाच्या निमित्ताने आपण वाचनाचे महत्व तर पाहणार आहोतच. कारण आज इंटरनेट आणि मोबाईलच्या दुनियेत तरुण पिढीने वाचनाला रामरामच ठोकला आहे. पण जशी आपण इतर गोष्टींची सवय लावून घेतो तसे वाचनाची सवय लावली पाहिजे.
हेही वाचा- तुम्हाला माहीत नसलेल्या पृथ्वीबद्दलच्या 'या' गोष्टी
वाचनाचे महत्व
वाचन हे कर्म आहे वाचन हे मर्म आहे ज्ञानाच्या महायज्ञात वाचन हाच धर्म आहे
या जगात माणसे आणि पुस्तके असंख्य आहेत, जेवढी शक्य होतील तेवढी जोडत चला. जेव्हा माणसं जवळपास नसतात तेव्हा पुस्तकं गप्पा मारतात, नवीन गोष्टी सांगतात, शिकवतात. खरंच वाचन हा एक संवाद आहे. यामुळे आपल्या
शब्दांचे उच्चार सुधारतात आणि वेग वाढतो. त्यातून एका प्रसंगावर चर्चा होते. त्यामुळे वाचलेलं मनात खोलवर पेरले जाते आणि चांगले लक्षात राहते. पुस्तकांव्यतिरिक्त इतर माध्यमे म्हणजे खत आणि पाणी म्हणून वापरली पाहिजेत.
मराठीतील प्रसिद्ध लेखक आणि त्यांची पुस्तकं
शिवाजी सावंत - युगंधर, छावा
शिव खेरा, यश तुमच्या हातात
भालचंद्र नेमाडे, कोसला
श्याम मराठे, यशाची गुरुकिल्ली, अभ्यासाची सोपी तंत्रे, मनोरंजक शून्य
प्रल्हाद केशव अत्रे (प्र के अत्रे) - डॉ. लागू, झेंडूची फुले, कर्हेचे पाणी, तो मी नव्हेच
पुल देशपांडे - बटाट्याची चाळ, व्यक्ती आणि वल्ली
साने गुरुजी - श्यामची आई
चिंतामण त्र्यंबक खानोलकर (आरती प्रभू) - एक शून्य बाजीराव (नाटक), कालाय तस्मै नमः (नाटक), कोंडुरा (कादंबरी)
विवा शिरवाडकर (कुसुमाग्रज) - फक्त लढ म्हणा (कविता), जीवनलहरी, किनारा, महावृक्ष
राम गणेश गडकरी (गोविंदाग्रज) - एकच प्याला, प्रेमसन्यास, भावबंधन, वेड्याचा बाजार
वीणा गवाणकर - एक होता कारवर
वि. स. खांडेकर - हिरवा चाफा, अमृतवेल, कोंचवध, ययाती
वि वा शिरवाडकर - नटसम्राट, आहे आणि नाही
विश्वास पाटील - झाडाझडती
वि ग कानिटकर - नाझी भस्मासुराचा उदयास्त
वसंत पुरुषोत्तम काळे (व. पु. काळे) - गुलमोहर, काही काही खोटं, घर हलवलेली माणसं, तप्तपदी
Can you send me the PDF of the above books.
उत्तर द्याहटवाया लिंकवर सर्व मराठी भाषेतील पुस्तकांची यादी देणं केवळ अशक्य. कारण मराठी मध्ये अनंत कोटी पुस्तके असतील.
उत्तर द्याहटवाया लिंकवर सर्व मराठी भाषेतील पुस्तकांची यादी देणं केवळ अशक्य. कारण मराठी मध्ये अनंत कोटी पुस्तके असतील.
उत्तर द्याहटवाटिप्पणी पोस्ट करा