जेव्हा पृथ्वी दिन सुरू झाला तेव्हा तो २१ आणि २२ एप्रिल रोजी साजरा केला जात असे. १९७० पासून तो २२ एप्रिलला साजरा होण्यास सुरुवात झाली.
अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को गेलार्ड नेल्सन यांनी 1970 मध्ये सर्वप्रथम अर्थ डे ही संकल्पना मांडली. तेव्हापसून 22 एप्रिल हा दिवस प्रतिवर्षी वसुंधरा दिन म्हणून साजरा केला जातो. त्यामुळे एका अर्थाने गेलार्ड नेल्सन हे या दिवसाचे जनक आहेत असे मानले जाते.
जंगल, डोंगर, नद्या, वायू, जमीन आणि समुद्र यांमुळे या सृष्टीतील पर्यावरण चांगले राहते. या घटकांची पर्यावरण संवर्धनात प्रमुख भूमिका असते. अलिकडे मानवाला विकास आणि प्रगती या दोन गोष्टींची चटक लागली आहे. त्यामुळे मानव निसर्गावर विजय मिळवू पाहात आहे. ज्यामुळे पर्यावरणाला धक्का पोहोचत आहे. अशा या अत्यंत अणिबाणीच्या काळात वसुंधरा दिनाचे महत्त्व अधिक वाढले आहे.
आज वसुंधरा दिन. या वसुंधरेवर आपण जन्म घेतो, वाढतो आणि तिच्याच मातीत मिसळून शेवटचा श्वास घेतो. आख्खं आयुष्य आपण या पृथ्वीतलावर काढूनही तिच्याविषयी आपल्याला किती माहिती असते? जाणून घ्या आपल्या वसुंधरेच्या 'या' गोष्टी
जगातील सर्वांत जास्त पाऊस कोठे पडतो?
दक्षिण अमेरिकेतील कोलंबिया या देशातील लोरा या ठिकाणी ५२३.६ इंच पाऊस दरवर्षी पडतो.
जगातील सर्वांत लांब दरी कोणती?
अर्थात अमेरिकेतील ग्रॅंड कॅनियन. तिची लांबी ४४६ किलोमीटर आहे. पण मंगळावीरल व्हॅली मेरीनेरीसची तुलना करता ही दरीही छोटी पडेल. कारण मंगळावरच्या या दरीची लांबी आहे, तब्बल ४८०० किलोमीटर.
हवेत फक्त ऑक्सिजन असतो?
पृथ्वीवर ८० टक्के नायट्रोजन असतो. आणि उरलेल्या भागात ऑक्सिजन आणि इतर घटक असतात.
जगातील पाण्यापैकी समुद्रातील पाण्याचे प्रमाण किती?
समुद्रातील पाणी जगाच्या एकूण पाण्याच्या तुलनेत ९७ टक्के आहे. म्हणजे तीन टक्के पाणी जगभरात पिण्यासाठी उपलब्ध आहे.
जगातील सर्वांत मोठा समुद्र कोणता?
पॅसिफिक अर्थात प्रशांत महासागर. त्याचे क्षेत्र १६५ मिलीयन स्क्वेअर मैल आहे. म्हणजे अटलांटिक समुद्रापेक्षा हा दुप्पट मोठा आहे. त्याची खोली सरासरी ३.९ किलोमीटर आहे.
गडगडाट कशामुळे होतो?
जेव्हा वीज चमकते तेव्हा आजूबाजूचे ढग अत्यंत तापतात. त्यांच्यात निर्माण झालेली उष्णता सूर्यापेक्षा पाच पटीने जास्त असते. या अचानक निर्माण झालेल्या उष्णतेने हवा ध्वनीपेक्षा जास्त वेगाने प्रसरण पावते. त्यामुळे हवा दाबली जाऊन चकचकाट निर्माण होतो आणि त्यातून गडगडाट ऐकू येतो.
जगातील सर्वांत मोठा ज्वालामुखी कोठे आहे?
अमेरिकेच्या हवाई बेटांवरील मौना लोआ हा ज्वालामुखी जगात सगळ्यात मोठा आहे. त्याची उंची त्याच्या बेसहून पन्नास हजार फूटांहून अधिक आहे.
सर्वांत भयंकर भूकंप कोठे झाला होता?
मध्य चीनमध्ये १५५७ मध्ये झालेला भूकंप पृथ्वीवरचा आतापर्यंतचा सर्वांत भयानक भूकंप मानला जातो. प्रामुख्याने मऊ दगड असलल्या गुहांमध्ये लोक रहात असलेल्या भागात हा भूकंप झाला आणि जवळपास ८ लाख ३० हजार लोकांना गिळंकृत करून गेला.
पृथ्वीचा मध्य कोठे आहे?
पृथ्वीचा मध्य पृष्ठभागापासून ६ हजार ३७८ किलोमीटर आत आहे. विशेष आतमध्ये सगळा द्रव भरलेला आहे. वरचे आवरण फक्त ६६ किलोमीटर एवढे जाड आहे. नेहमीच्या भाषेत सांगायचे तर सफरचंदाच्या सालीपेक्षा थोडे जाड इतकेच.
जगातील सगळ्यात उष्ण जागा कोणती?
लिबियातील एल अझिझा ही जगातील सगळ्यात तप्त जागा आहे. १३ सप्टेंबर १९२२ ला या जागी जगातील आतापर्यंतचं सगळ्यात उष्ण म्हणजे ५७.८ अंश सेल्सियस तापमान नोंदवलं गेलं.
जगातील सगळ्यांत थंड ठिकाण?
अंटार्क्टिकावरील वास्टोक हे पृथ्वीतलावरचं सगळ्यात थंड ठिकाण म्हणून नोंदवलं गेले आहे. २१ जुलै १९८३ रोजी तेथील तापमान उणे ८९ इतके नोंदवले गेले आहे.
अवकाशातून दरवर्षी किती धूळ पृथ्वीवर पडते?
याचे प्रमाण वेगवेगळे सांगितले जाते. पण यूएसजीएस या संस्थेच्या मते दरवर्षी एक हजार मिलीयन ग्रॅम्स किंवा अंदाजे एक हजार टन धूळ दरवर्षी पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करते.
जगातील सर्वांत उंच धबधबा कोठे आहे?
व्हेनेझुएला येथील एंजल फॉल्स हा सर्वांत उंचीवरून म्हणजे जवळपास ३२१२ फूटांवरून ( ९७९ मीटर) जमिनीवर कोसळतो.
जगातील सर्वांत उंच पर्वत कोणता?
अर्थात माऊंट एव्हरेस्ट. नेपाळ व तिबेटमध्ये असलेले माऊंट एवह्रसेट् हे शिखर समुद्रसपाटीपासून २९ हजार ०३५ फूट म्हणजे नऊ किलोमीटर उंच आहे.
चंद्र पृथ्वीच्या अगदी जवळ होता का?
चंद्र एक अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वीच्या अगदी जवळ होता. त्याला स्वतःभोवती फिरायला फक्त वीस दिवस लागत. म्हणजे एक महिना वीस दिवसांत पूर्ण होत असे. त्यामुळे त्यावेळी पृथ्वीवरील दिवसही फक्त १८ तासांचा होता.
पृथ्वीवरची सर्वांत लांब नदी?
अर्थात आफ्रिकेतून वाहणारी नाईल नदी. ही नदी ६ हजार ६९५ किलोमीटर लांब आहे.
जगातील सर्वांत दुष्काळी प्रदेश?
चिली या दक्षिण अमेरिकी देशातील एरीका या भागात फक्त ०.०३ इंच पाऊस पडतो. व्यवहारिक भाषेत सांगायचं झाल्यास अशा पावसात कॉफीचा एक कप भरायला शंभर वर्षे लागतील.
Nice Information..👍
उत्तर द्याहटवाटिप्पणी पोस्ट करा