हॅपी बर्थडे एसीपी प्रद्युम्न उर्फ शिवाजी साटम

सीआयडी मालिकेद्वारे घराघरांत पोहोचलेले छोट्या पडद्यावरील बडे अभिनेते शिवाजी साटम यांचा आज जन्मदिवस...!

एकेकाळी बँकेत कॅशियरची नोकरी करणारे शिवाजी साटम यांच्या बद्दल जाणून घ्या खास गोष्टी

आज शिवाजी साटम उर्फ एसीपी प्रद्युम्न यांचा 70 वा वाढदिवस. त्यांनी देशातील सर्वात जास्त वेळेसाठी चालणाऱ्या टीव्ही शो CID मध्ये काम केले आहे. यातील त्यांनी साकारलेल्या एसीपी प्रद्युम्नच्या भूमिकेने लोकांच्या हृदयात स्थान मिळवले आहे.


शिवाजी साटम यांनी अनेक मराठी आणि हिंदी सिनेमामधील अभिनयाने लोकांच्या मनावर एक छाप पाडली आहे. कलेच्या दुनियेतील अप्रतिम कलाकारांमध्ये त्यांचे नाव आहे.

शिवाजी साटम हे फिल्म इंडस्ट्री मध्ये येण्यापूर्वी एका सेंट्रल बँकेत कॅशिअरची नोकरी करत होते. त्यांनी 1987 मध्ये पेस्टोनजी चित्रपटातून फिल्मी करिअरची सुरवात केली. त्यांनी संजय दत्त, राणी मुखर्जी यांसारख्या अनेक दिग्गज कलाकारांच्या वडिलांची भूमिका साकारली आहे.

CID च्या शूटिंग दरम्यान एकदा शिवाजी साटम मोठ्या अपघातातून वाचले आहेत. शूटिंग दरम्यान शिवाजी साटम बर्फाखाली दबले जाणार होते तेव्हा त्यांना सिरीयलच्या क्रूने वाचवले होते.

मध्यंतरी CID मधील एसीपी प्रद्युम्नच्या मृत्यूची बातमी परसली होती. पण ती एक अफवा होती.
 2014 मध्ये CID सिरीयल चे लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस् आणि गिनीज बुक मध्ये नोंद झाली आहे. 111 मिनिटचा पूर्ण एपिसोड सिंगल शॉट मध्ये कोणताही कट न घेता शूट केला गेला होता.

अभिजीत साटम

खाजगी जीवनामध्ये बोलायचे झाले तर शिवाजी साटम यांच्या पत्नीचे नाव अरुणा साटम आहे. त्यांचा मुलगा अभिजीत साटम मराठी चित्रपट अभिनेता तसेच प्रोड्युसर आहे. अभिजीत संमसाटमने उत्कृष्ट मराठी चित्रपट अभिनेत्री मधुरा वेलणकर हिच्याशी विवाह केला आहे.

शिवाजी साटम यांनी साकारलेल्या 10 अप्रतिम भूमिका:


1) चित्रपट: टॅक्सी नंबर 9211
     भूमिका: अर्जुन बजाज
2) चित्रपट: उत्तरायण
     भूमिका: रघु
3) चित्रपट: नायक
     भूमिका: मंजिरी( राणी मूखर्जी) चे वडील
4) चित्रपट: जीस देश मे गंगा रहता है
     भूमिका: गंगा(गोविंदा) चे वडील
5) चित्रपट: वास्तव
     भूमिका: नामदेव
6) चित्रपट: चायना गेट
     भूमिका: गोपीनाथ
7) चित्रपट: गुलाम-ए-मुस्तफा
    भूमिका: दयानंद दीक्षित
8) चित्रपट: यशवंत
    भूमिका: पोलिस इन्स्पेक्टर जोशी
9) चित्रपट: सुर्यवंशम
     भूमिका: राधाचे वडील
10) टीव्ही शो: CID
     भूमिका: एसीपी प्रद्युम्न

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने