जाणून घ्या स्मार्टफोन मध्ये लपलेले फिचर्स


स्मार्टफोन तर आज काळाची गरज बनली आहे. स्मार्टफोन शिवाय जीवनच नाही अशी आताची आत्ताची स्थिती आहे. पण मित्रांनो स्मार्टफोन वापरात असताना त्यामध्ये कोणकोणते महत्वाचे फिचर्स लपलेले आहेत आणि ते कसे वापरायचे ते बहुतेक जास्त लोकांना माहीत नसते. चला तर मग आज आपण पाहू असे काही खास लपलेले फिचर्स.

हरवलेल्या स्मार्टफोनला करा कायमचे लॉक


जर तुमचा स्मार्टफोन चोरी झाला असेलं किंवा हरवला असेल तर तुम्ही घरी बसल्या तुमच्या फोनला लॉक करू शकता. यासाठी तुम्हाला १५ अंकी IMEI नंबर माहीत असणे गरजेचे आहे. तुमच्या मोबाईल कंपनीमध्ये कॉल करा, आणि त्यांना आपला १५ डीजीटचा IMEI नंबर सांगा आणि आपला फोन लॉक करून घ्या. ह्यानंतर तुमच्या फोनचे सर्व फीचर्स लॉक होऊन जातील.

smartphone features

फोनच्या जास्त सिक्युरिटीसाठी वापरा फेस लॉक


स्मार्टफोनमध्ये फोनला लॉक करण्याच्या अनेक पद्धती असतात. तुम्हाला तुमच्या फोनला सुरक्षित ठेवायचं आहे तर तुम्ही ‘फेस लॉक’ चं ऑप्शन वापरू शकता. हे ऑप्शन तुम्हाला सेटिंग–सिक्योरिटी–स्क्रीन लॉक हा मेन्यू मिळेल. ज्याने तुम्ही फेस लॉक करून आपला फोन सुरक्षित ठेवू शकता.

नॉन वॉटरप्रूफ स्मार्टफोनने पाण्याखालील फोटो घेऊ शकता


तुमचा फोन हा वॉटरप्रूफ नाही? तर चिंता कसली? तुम्ही तुमच्या या वाटरप्रूफ नसलेल्या स्मार्टफोनने देखील पाण्याच्या खाली फोटो घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला केवळ तुमच्या फोनसाठी एक पॉलीथीन केस बनवावी लागेल. त्यांनतर तुम्ही आरामात पाण्याच्या आत देखील फोटोज घेऊ शकता.

लहान आणि स्वस्त लेन्स वापरून सुद्धा फोनला 'मायक्रोस्कोप' बनवू शकता


मायक्रोस्कोप साठी तुम्हाला कुठल्याही महाग डिवाईस विकत घेण्याची गरज नाही. कुठल्याही लहान आणि स्वस्त लेन्सचा वापर करून तुम्ही तुमच्या स्मार्टफोनला मायक्रोस्कोप बनवू शकता. आणि कुठल्याही वस्तूचे अगदी “मॅग्नीफाईड फोटो घेऊ शकता.

6 टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने