बाइसिकल डे 2020

सायकल चालवण्याचे अनेक फायदे आपल्याला ठाऊक आहेत. सायकल चालवल्यामुळे शारीरिक-मानसिक स्वास्थ्य तर लाभतेच. त्याचबरोबर पर्यावरणाचेही नुकसान टाळता येते. कारण सायकलमुळे हवा, ध्वनी प्रदूषण होत नाही. तर बाइसिकल डे 2020 निमित्ताने सायकल संबंधित काही इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेऊया...

▪️जगातील सर्वात लांब सायकल ही 20 मीटरपेक्षा जास्त लांबीची असून त्यावर 35 लोक बसू शकतात.

▪️सायकलस्वारांची संख्या जर 3 पटीने वाढली तर जगातील बाईक चालवण्याचे प्रमाण निम्मे होईल.

▪️जगातील पहिली सायकल ही फ्रान्समध्ये तयार करण्यात आली होती. पण सायकलला मॉडर्न रुप इंग्लंडमध्ये देण्यात आलं.

▪️जगातील सर्वात वेगवान सायकलस्वार अमेरिकन असून त्याचे नाव जॉन हॉवर्ट आहे. तासाला 133.75 किमी हा त्याचा सर्वाधिक स्पीड आहे.

▪️जेवढी ऊर्जा चालण्यासाठी लागते तेवढी ऊर्जा सायकल चालवण्यासाठी वापरली तर आपण तीनपट्ट अधिक अंतर तितक्याच वेळात पार करु शकतो.

▪️सायकल ही गाडी पेक्षा 20 पट कमी किंमतीची असून तिच्या देखभालीचा खर्चही कमी आहे.

▪️नेदरलँडमध्ये ज्यांचे वय 15 पेक्षा जास्त आहे. अशा प्रत्येकी 8 पैकी 7 माणसांकडे सायकल आहे.

▪️सायकलिंगमुळे रक्तप्रवाह तुमचा सुरळीत होतो. त्यामुळे हृदयविकार होण्याची शक्यता बऱ्याच अंशी कमी होते.

▪️नियमित सायकल चालवल्याने हाता-पायाचे स्नानू मजबूत होतात.

▪️सायकल चालवल्याने लोव्हर बॉडी मसल्सची स्ट्रेंथ वाढते.

----------------------------------------------------
📣 देश, विदेश ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी जॉईन करा स्वराज्य डिजिटल मॅगझीन आपल्या व्हाट्सअप्प वर मोफत, जॉईन करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा 👉 http://swarajya24.com त्यामध्ये माहिती भरा आणि सबमिट करा. त्यांनंतर येणारा मोबाईल नंबर स्वराज्य नावाने सेव्ह करा
----------------------------------------------------

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने