मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी दुपारी जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी करोना व्हायरस आणि राज्यातील स्थिती आणि उपाययोजना या मुद्यावर भाष्य केलं. 

ठळक मुद्दे:

➡️स्थलांतरित कामगारांसाठी केंद्र सरकारशी चर्चा सुरु आहेत, तोपर्यंत महाराष्ट्र्र सरकार या कामगारांची काळजी घेईल, आणि जेव्हा हे कामगार घरी परततील तेव्हा त्यांच्या मनात भीती नसेल आणि आनंदाने घरी जातील अशी आम्ही तरतूद करू असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.

➡️घरगुती हिंसाचार, मानसिक छळाच्या घटनांसाठी महिलांना 100 क्रमांकावर संपर्क करता येणार: उद्धव ठाकरे

➡️महाराष्ट्रातील जिल्ह्याच्या सीमा 3 मे पर्यंत उघडणार नाही: उद्धव ठाकरे

➡️ग्रीन आणि ऑरेंज झोन मध्ये उद्यापासून उद्योगांना कामाची परवानगी: उद्धव ठाकरे

➡️Non-COVID तक्रारींसाठी खाजगी रुग्णालय, क्लिनिक उद्यापासून पूर्णवेळ सुरु होणार: उद्धव ठाकरे

➡️महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत 66 हजार 796 कोरोना चाचण्या झाल्या आहेत: उद्धव ठाकरे

➡️शेती आणि कृषी , जीवनावश्यक वस्तूंच्या सेवेत अडथळा येणार नाही: उद्धव ठाकरे

----------------------------------------------------
📣 देश, विदेश ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी जॉईन करा स्वराज्य डिजिटल मॅगझीन आपल्या व्हाट्सअप्प वर मोफत, जॉईन करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा 👉 http://swarajya24.com त्यामध्ये माहिती भरा आणि सबमिट करा. त्यांनंतर येणारा मोबाईल नंबर स्वराज्य नावाने सेव्ह करा
----------------------------------------------------

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने