UPSC

काही दिवसांपूर्वी युपीएससी आणि एमपीएससीच्या परिक्षा रद्द करण्यात आल्याची अफवा सर्वत्र पसरली होती.  मात्र पीआयबी महाराष्ट्र यांनी याबाबत अधिक खुलासा केला असून परिक्षा रद्द करण्यात आल्या नाहीत. पण त्या संदर्भातील नोटीस संकेस्थळावर जाहीर केली जाईल असे स्पष्ट करण्यात आले होते. 

आयोगाने 3 मे 2020 नंतर सिव्हिल सेवा 2019 साठीचे इंटरव्यू आणि अन्य परिक्षांच्या नव्या तारखा जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना व्हायरसच्या कारणामुळे युपीएससीकडून काही परिक्षा आणि इंटरव्यू स्थगित करण्यात आले होते. 

तर सिव्हिल सेवा परिक्षा 2019 साठी इंटरव्हू 17 फेब्रुवारी पासून सुरु होणार होते. मात्र कोरोना व्हायरसमुळे त्या स्थगित करण्यात आल्या होत्या. 2019 मधील युपीएससी परिक्षेत एकूण 2304 उमेदवार उत्तीर्ण झाले होते. जे आता इंटरव्हू मध्ये सहभागी होणार होते.

----------------------------------------------------
📣 देश, विदेश ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी जॉईन करा स्वराज्य डिजिटल मॅगझीन आपल्या व्हाट्सअप्प वर मोफत, जॉईन करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा 👉 http://swarajya24.com त्यामध्ये माहिती भरा आणि सबमिट करा. त्यांनंतर येणारा मोबाईल नंबर स्वराज्य नावाने सेव्ह करा
----------------------------------------------------

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने