एक निसर्गरम्य देश जो दुसऱ्या देशांकडून आयात करतो कचरा!

मित्रांनो कचरा म्हंटले की सर्वजण  त्यापासून दूर पळतात. सगळ्यांसाठी कचरा हा डोखेदु:खी आहे! आपल्या भारतात तर स्वच्छ भारत अभियान ही मोहीम राबण्यात आली असून सर्व जण कटाक्षाने कचऱ्याची व्हिलेवाट लावताना दिसतात. 

पण तुम्हाला माहीत आहे का, स्वीडन हा एकमात्र असा देश आहे जो इतर देशांकडून चक्क कचरा खरेदी करतो. काय वाटले ना नवल? 


काय आहे कारण?

स्वीडन या देशाची ओळख एक निसर्गरम्य आणि सुंदर देश अशी आहे. या देशात पर्यावरणपूरक वस्तूच वापरण्याकडे जास्त कल आहे. या देशात 80% वीज ही कचऱ्यापासून बनवली जाते. पण आता या देशाला कचऱ्याचा तुटवडा जाणवत आहे आणि कचऱ्याअभावी देशात सुरु असलेले रिसायकलिंग प्रकल्प बंद करण्याची पाळी आली आहे.

उर्जा निर्मितीसाठी स्वीडनने सध्या आठ देशातून कचरा आयात केला जात आहे. नॉर्वे, जर्मनी, डेन्मार्क, फ्रांस आणि अन्य युरोपीय देशांकडून कचरा आयात केला आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने