😢 झारखंड मधील एका गावात धक्कादायक घटना समोर आली आहे.


झारखंडमधील धनबाद येथे शाळेतील मुले बॉल समजून चक्क बॉम्बशी खेळत होती. बॉम्बचा स्फोट झाल्याने 3 मुलं गंभीर जखमी झाली आहेत. त्यातील एका मुलाची स्थिती अत्यवस्थ असून त्यांच्यावर उपचार चालू आहेत. 

हा बॉम्ब जमिनीखाली होता. मुलांच्या हाती खेळता खेळता तो बॉम्ब लागला आणि मुलांनी तो बॉम्ब बॉल समजून जमिनीवर आदळताच त्याचा स्फोट झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. 

पोलिसांनी या ठिकाणी एका प्लास्टिकच्या डब्यात लपवून ठेवलेले बॉम्ब ताब्यात घेतले. पण हे बॉम्ब येथे कोणी ठेवले याची माहिती अजून मिळालेली नाही.


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने