गप्रसिद्ध पॉपस्टार रिहाना (Rihanna) आपल्या वादग्रस्त वक्तव्य आणि न्यूड फोटोशूटमुळं नेहमीच चर्चेत असते. अलिकडेच तिनं देशभरात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनातही भाग घेऊन भारतीयांचं लक्ष वेधून घेतलं होतं.

( 17 FEB 2021- या राज्यात स्वस्त झाले पेट्रोल-डिझेल, तर काही राज्यात गाठली शंभरी )

अलिकडेच तिनं आपल्या एक्स फेंटी या वेबसाईटसाठी एक न्यूड फोटोशूट केलं. यापैकी एक फोटो तिनं ट्विटरवर शेअर केला. मात्र हा फोटो पाहून भारतीय नेटकरी संतापले आहेत. कारण हे न्यूड फोटोशूट करताना तिनं आपल्या गळ्यात श्री गणेशाचं लॉकेट घातलं होतं. “तू आमच्या देवतेचा अपमान करत आहेस.” अशा आशयाची ट्विट्स करुन भारतीय नेटकरी तिला ट्रोल करत आहेत. अर्थात या ट्विटवर रिहानाने अद्याप कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

👀 येथे पाहा ट्विट 👉 रिहाना टॉपलेस फोटो ट्विट

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने