राजस्थानमधील श्रीगंगानगरमध्ये आज पेट्रोल 100.07 रुपयांवर पोचले. भोपाळमधील एक्सपी पेट्रोल 100.44 रुपये प्रतिलिटरवर गेले. राजस्थानमध्ये पेट्रोलियम पदार्थांवर सर्वाधिक व्हॅट दर आहेत. गेल्या महिन्यात राजस्थानने पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅटमध्ये दोन रुपये प्रतिलिटर कपात केली. 


या राज्यात पेट्रोल 5 रुपयाने तर डिझेल 7 रुपयाने झाले स्वस्त 

मेघालय सरकारने मंगळवारी पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धित कर (व्हॅट) कमी केला, जेणेकरुन राज्यातील या पेट्रोलियम इंधनांचे दर 5 रुपये लिटरहून अधिकने कमी झाले. 

मुख्यमंत्री कोनराड के संगमा यांनी आपल्या मंत्रिमंडळातील सदस्यांसह व वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेतली. बैठकीनंतर घेण्यात आलेल्या निर्णयात राज्यातील पेट्रोलचे दर 91.26 रुपयावरून 85..86 रुपये प्रति लिटर स्वस्त झाले आहे. त्याचप्रमाणे डिझेल प्रति लिटर 86.23 रुपयांवरुन 79.13 रुपयांपर्यंत खाली आले आहे. मेघालय राज्य सरकारने गेल्या आठवड्यात या इंधनांवर दोन रुपयांची सूट दिली होती. मुख्यमंत्री म्हणाले की, यामुळे पेट्रोलची किंमत 7.4 रुपयांनी स्वस्त झाली आहे तर डिझेल 7.1 रुपयांनी स्वस्त झाले आहे. राज्यातील व्यावसायिक वाहन चालक संपावर आहेत. संपाच्या दुसर्‍या दिवशी पेट्रोलियम इंधनावरील व्हॅट कमी करण्यात आला. 

इतर प्रमुख शहरांतील दर

दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलचे दर 25 पैशांनी वाढल्याने आता पेट्रोल 89.54 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 79.95 प्रति लीटर झाले आहे. तसेच मुंबईत सुद्धा पेट्रोल 96.00 रुपये आणि डिझेल 86.98 रुपये प्रति लीटरने विक्री केले जात आहे. कोलकाता येथे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती क्रमश: 90.78 रुपये प्रति लीटर आणि 83.54 रुपये प्रति लीटर झाले आहे. चेन्नईत पेट्रोल 91.68 रुपये आणि डिझेल 85.01 रुपये प्रति लीटर झाले आहे. 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने