👩 पुण्यातील एका उच्चशिक्षित तरुणीने डेटिंग साईटचा वापर करून 16 तरुणांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
😱 या 27 वर्षीय तरुणीने चॅटिंगच्या माध्यमातून तरुणांना लाखोंचा गंडा घातला आहे. तरुणीकडून १५ लाख २५ हजारांचे २९ तोळे सोन्याचे दागिने व मोबाईल जप्त करण्यात आले असून, या तरुणीला अटक करण्यात आली आहे.
🧐 काय आहे नेमका प्रकार?
बंबल आणि टिंडर डेटिंग साईटवरून ही तरुणी मुलांशी चॅटिंग करून त्यांना हॉटेलमध्ये बोलावून घेत असे. त्यांनतर त्यांना मद्यातून बेशुद्ध होण्याच्या गोळ्या देत असे आणि त्यानंतर त्यांच्या कडून सोने, पैसे, मोबाईल, मौल्यवान वस्तू घेऊन पसार होत असे.
तरुणी भेटायला आलेल्या तरुणाला बेशुद्ध करून त्यांच्या मोबाईल मधील बंबल अॅपवरील चॅटिंग डिलीट करायची त्यांनतर मोबाईल फोडून कचऱ्यात टाकायची. त्यामुळे पोलिसांच्या हाती ठोस पुरावा येत नव्हता. तरुणी उच्चशिक्षित असल्याने, तिने आपण नोकरी करत असल्याचे घरात सांगितले होते.
पोलिसांच्या माहीतीनुसार, संबंधित तरुणीने चेन्नई मधील एका मुलाशी बंबल या डेटिंग साईट वरून संपर्क साधला. त्याला पुण्यातील पिंपरी-चिंचवड शहरातील वाकड येथील सयाजी हॉटेलमध्ये भेटण्यासाठी बोलावले. त्यांनतर त्याला मद्यातून बेशुद्ध पाडणाऱ्या गोळ्या दिल्या आणि त्याचे पैसे व सोन्याच्या वस्तू घेऊन पसार झाली. संबंधित तरुणाने यासंदर्भात वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.
👍 आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी रचला सापळा
बंबल या टेडिंग अॅपवरून बनावट रिक्वेस्ट पाठवून तिला बोलण्यास भाग पाडले. त्यानंतर, ओळख वाढवून तिला भेटण्यासाठी बोलावून गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने तिला अटक केली.
टिप्पणी पोस्ट करा